मुंबई : गेल्या वर्षभरात करोनाचे संकट असतानाही मुंबई व महानगरात सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्र माची आर्थिक स्थिती बिकटच झाली आहे. प्रवासी व उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन न मिळण्याचे संकटच कोसळले आहे. त्यामुळे बेस्टसाठी मंजूर झालेले अनुदान नियमितपणे व तातडीने देण्याची मागणी बेस्ट उपक्र माने मुंबई पालिकेकडे के ली आहे.

वर्षभरात नियमित सेवा देताना १०६ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला.  कर्मचाऱ्यांना मार्च ते जूनपर्यंतचा ३०० रुपये करोना भत्ता मिळाला. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंतचा करोना भत्ता उपक्र माकडून अद्यापही मिळालेला नाही.

गेल्या वर्षभरात के वळ ३९८ कोटी २६ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून खर्च २ हजार २५७ कोटी ७५ लाख रुपये झाला आहे. बेस्टला १ हजार ८५९ कोटी ४९ लाख रुपये नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.