शासकीय कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तांना दिवाळीनंतरच वेतन-निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे. राज्यभरातील लेखा-कोषागारे विभागाचे बहुतांश अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामावर असल्याने दिवाळीपूर्वी पगार काढणे शक्य नाही. संबंधितांशी चर्चा करून आढावा न घेताच ९ ऑक्टोबर रोजी आदेश काढून २४ ऑक्टोबरपूर्वी पगार-निवृत्तिवेतन अदा करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच दोनच दिवसांमध्ये पुन्हा आदेश काढून आधीचे परिपत्रक स्थगित करण्यात आले आहे.