16 October 2019

News Flash

सलमान खानच्या बंगल्याची देखभाल अटकेत

शिक्षा टाळण्यासाठी राणा ओळख दडवून वास्तव्य करीत होता.

अभिनेता सलमान खान

२९ वर्षे पोलिसांना चकवा

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या गोराई येथील बंगल्याचा ‘केअर टेकर’ शक्ती राणा याला गुन्हे शाखेने अटक केली. साधारण २९ वर्षांपूर्वी राणाविरोधात चोरीसह मारहाणीचा गुन्हा नोंद होता. या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राणाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. शिक्षा टाळण्यासाठी राणा ओळख दडवून वास्तव्य करीत होता.

गुन्हे शाखेच्या अ‍ॅन्टॉपहिल कक्षाकडे वॉरंट बजावणीची जबाबदारी होती. राणा पूर्वी वरळीत वास्तव्य करत होता. मात्र या प्रकरणानंतर त्याने ती जागा बदलली. अ‍ॅन्टॉपहिल कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजेश पाटील व पथकाने राणाचा शोध सुरू केला. खबऱ्यांमार्फत पथकाला राणा गोराई किनाऱ्यावर ओळख बदलून वास्तव्य करत असल्याची माहिती पुढे आली. पोलीस चौकशीत राणा गोराई किनाऱ्यावरील अभिनेता सलमान याच्या बंगल्याचा केअर टेकर आहे, हे स्पष्ट झाले. गेल्या १५ वर्षांपासून राणा सलमानकडे काम करत होता.

First Published on October 10, 2019 1:01 am

Web Title: salman khan bungalow caretaker arrested in theft case zws 70