News Flash

“पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाचं महत्व काय समजणार?”

रक्तदान शिबिराचे आयोजक असणाऱ्या शिवसेना नेत्याचा राम कदम यांना टोला

शिवसेनेच्या माहीम-वरळी शाखेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराची सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे. या शिबीरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचे बॅनर्स सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. यावरुनच भाजपाचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर आता या शिबीराचे आयोजक असणारे स्थानिक नगरसेवक आणि युवासेना कार्यकारणी सदस्य समाधान सरवणकर यांनी राम कदम यांना उत्तर दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

करोना काळात रूग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत रक्ताची कमतरता भासत असल्याचे अनेकदा नेतेमंडळी, मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विविध संबंधित अधिकारी यांनी आपल्या निवेदनातून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर लगेचच शिवसेनेच्या माहीम-वरळी शाखेचे स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांनी एक रक्तदान शिबीरआयोजित केलं. या शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्याला एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचे बॅनर परिसरात लावण्यात आले.

राम कदम यांची टीका

त्यानंतर शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या रक्तदान शिबीरावर राम कदम यांनी ट्विटवरुन टीकास्त्र सोडलं. “राज्यात आणि मुंबईत रक्तसाठ्याचा तुटवडा आहे. या तुटवड्यासाठी ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदात्यांना चिकन किंवा पनीरचं आमिष दाखवलं जातंय. अशा प्रकारची नामुष्की ओढवण्यामागे सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे”, असे राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये या रक्तदान शिबीरावर टीका करताना म्हटलं.

सरवणकर यांचे उत्तर

राम कदम यांनी केलेल्या टीकेची बातमी समोर आल्यानंतर आयोजक सरवणकर यांनीही ट्विटरवरुन राम कदम यांनी उत्तर दिलं आहे. “पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाच महत्व काय समजणार?, त्यांची अक्कल तोकडी आहे,” असा टोला सरवणकर यांनी राम कदम यांना लगावला आहे. तसेच कोव्हिडच्या काळात रक्तदान शिबीर आयोजन न झाल्याने आज महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे याकडे लक्ष वेधून घेत सरवणकर यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.

सरवणकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन देण्यात येणार आहे. रक्तदाते शाकाहारी असल्यास त्यांना एक किलो पनीर देण्यात येणार आहे असे बॅनर स्थानिक भागात लावण्यात आले आहेत. १३ डिसेंबर रविवारी हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानावर हे रक्तदान शिबीर असणार आहे. त्यासाठी ११ डिसेंबरपूर्वी नोंदणी करायची आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 2:09 pm

Web Title: samadhan sarvankar slams ram kadam over blood donation criticism scsg 91
Next Stories
1 शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीसमोर हजर, चौकशीला सुरुवात
2 “चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा,” संजय राऊतांची मोदी सरकारकडे मागणी
3 शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले…
Just Now!
X