शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंगावर शाई टाकण्याचा प्रयत्न बुधवारी पाटण (जि. सातारा) येथे एका कार्यक्रमात घडला. गजानन औंधकर असे शाई टाकणाऱ्याचे नाव असून, त्याच्यासह काहीजणांना पोलिसांनी अटक केली आहे. औंधकरसह अटक झालेले सर्वजण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले. त्यामुळे या हल्ल्यामागे संभाजी ब्रिगेड संघटना असल्याचा संशय आहे. शिवशाहिरांनी मात्र या प्रकारास फारसे महत्त्व दिलेले नाही.
प्रा. बी. डी. चव्हाण यांनी पाटणकर घराण्यावर लिहिलेल्या ‘सरदार घराण्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ासाठी शिवशाहीर पाटण येथे आले होते. या कार्यक्रमास कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यावर शिवशाहीर गाडीत बसत असताना औंधकर याने त्यांच्या अंगावर शाई टाकण्याचा प्रयत्न केला. या वेळी ही शाई त्यांच्या अंगावर न पडता अन्यत्र पडली. ही घटना घडताच सर्वत्र खळबळ उडाली. उपस्थित जमावाने औंधकर यास चोप दिला. यानंतर पाटण पोलिसांनी औंधकर (वय २६, रा. कासेगाव, जि. सांगली) याच्यासह काहीजणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना शिवशाहिरांनी ‘बहुधा आज शिवशकातील रंगपंचमी असावी’ अशी मिस्कील प्रतिक्रिया देत या घटनेला महत्त्व दिले नाही.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा