शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र संभाजी ब्रिगेडने या सिनेमाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात चपला घालून पुष्पहार पुष्पहार अर्पण करताना दिसतो आहे. याच दृश्याला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी ही भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली. तसेच हे दृश्य सिनेमातून वगळण्याची मागणी केली. हे दृश्य वगळले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असाही इशारा त्यांनी दिला.

संभाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मित आहेत. मात्र या सिनेमातला तो पुष्पहाराचा प्रसंग संभाजी महाराजांचा अपमान करणारा आहे. सिनेमातील हे दृश्य तातडीने वगळण्यात यावे. निर्माता आणि दिग्दर्शक यांनी यासंदर्भातला निर्णय तातडीने घ्यावा नाहीतर हा सिनेमा या दृश्यासह प्रदर्शित होऊ देणार नाही असे ढोके यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्त्व मोठे आहे, त्याबद्दल आमच्या मनात काही शंकाच नाही. मात्र संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न ज्या दृश्यात झाला आहे ते दृश्य वगळण्यात यावे अशी आमची मागणी आहे असेही ढोके यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji brigade oppose on thackeray movie release
First published on: 19-01-2019 at 18:15 IST