07 April 2020

News Flash

समीर यांना ३१ मार्चपर्यंत कोठडी

न्यायालयाने ‘ईडी’ची ही मागणी मान्य करत समीर यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मार्चपर्यंत वाढ केली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

काका-पुतणे आता न्यायालयात एकमेकांसमोर येणार

महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासह अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने सोमवारी ३१ मार्चपर्यंत वाढ केली. विशेष म्हणजे याच घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड कारागृहात असलेले छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदतही ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान फार वेळ समोरासमोर येऊ न शकलेले भुजबळ काका-पुतणे ३१ मार्च रोजी न्यायालयात समोरासमोर येण्याची शक्यता आहे.समीर यांच्या न्यायालयीन कोठडीची सोमवारी मुदत संपल्याने त्यांना विशेष आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी समीर यांनी वकिलाच्या माध्यमातून मालमत्ता, आर्थिक व्यवहार, परदेशातील गुंतवणूक याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र ही कागदपत्रे अपुरी असून असे करून समीर यांच्याकडून तपासाला खीळ घालण्याचा प्रकार होत आहे, असा आरोप ‘ईडी’तर्फे करण्यात आला. शिवाय समीर यांचे राजकीय स्थान पाहता ते पुरावे नष्ट करण्याची, साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी ‘ईडी’कडून करण्यात आली.

न्यायालयाने ‘ईडी’ची ही मागणी मान्य करत समीर यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मार्चपर्यंत वाढ केली. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदतही ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे काका-पुतण्यांना ‘ईडी’तर्फे एकाच वेळी न्यायालयात सादर करण्यात येईल, अशी शक्यता आहे. न्यायालयाने दोन दिवसांच्या ‘ईडी’च्या कोठडीनंतर छगन भुजबळ यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांच्या कोठडीत अगदी दीड-दोन तासच काका-पुतण्यांना समोरासमोर आणून ‘ईडी’ला चौकशी करता आली होती. हे कारण सांगून छगन भुजबळ यांच्या ‘ईडी’ कोठडीत वाढ करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली होती.

असहकार कायम

समीर यांचे तपासातील असहकार्य अद्यापही कायम असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2016 4:05 am

Web Title: sameer bhujbal get jail till 31st march
Next Stories
1 ट्विटरची भारतात दशकपूर्ती
2 वसंत डावखरे पुन्हा रिंगणात
3 चिनी बनावटीच्या पिचकाऱ्यांची पीछेहाट!
Just Now!
X