मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या समीत ठक्कर याला सोमवारी मुंबईतील कोर्टाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

समीत ठक्करला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याच्या आरोपांखाली २४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या कोर्टाने ठक्करला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. समीत ठक्करला कोर्टात हजर करण्याच्या सरकारच्या पद्धतीवर भाजपासहित अनेक राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते.

समीर ठक्करचे ट्विटरवर ५९,००० फॉलोवर्स आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकारी देखील सोशल मीडियावर त्याला फॉलो करतात. नागपूर पोलिसांनी त्याच्या आक्षेपार्ह टिपण्णीबद्दल २४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. नागपूरच्या कोर्टाने ठक्करला जामीन दिल्यानंतर लगेचच मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला मुंबईतील कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर या कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली होती.

ठक्करला अटक केल्यानंतर पोलिसांनी तो भाजपाचा पदाधिकारी असल्याचं म्हटलं होतं. पण भाजपाने ठक्कर हा आपल्या पदाधिकारी किंवा आयटी सेलचा सदस्य नसल्याचं म्हटलं. समीत ठक्करने ट्विटरवर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पेन्ग्विन असं संबोधित केलं होतं.