News Flash

संदीप आचार्य यांना ‘राजहंस पुरस्कार’

आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील पत्रकारितेतील कामगिरीबद्दल गौरविण्यात येणार आहे.

गेली १५ वर्षे रुग्णसेवेचे काम करणाऱ्या ‘राजहंस प्रतिष्ठान’ या संस्थेचा ‘राजहंस पुरस्कार-२०१७’ कुष्ठरोग निवारणासाठी काम करणाऱ्या ‘लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निवारण’ संस्थेचे संस्थापक डॉ. जगदीश सामंत यांना जाहीर झाला असून पुष्पगुच्छ, शेला, स्मृतिचिन्ह आणि ५० हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना त्यांच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील पत्रकारितेतील कामगिरीबद्दल गौरविण्यात येणार आहे.

शास्त्रीय संगीत गायिका विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, व्याख्यात्या विदुषी धनश्री लेले, ‘इंडिगो रेमेडिज’चे अध्यक्ष आणि ‘सुमती संगोपन ट्रस्ट’चे संस्थापक सुरेश कारे यांना जाहीर झाला आहे. संगीत प्रचाराचे कार्य करणाऱ्या कमलाकर नेने स्मृती विशेष पुरस्कार शास्त्रीय संगीत गायिका यशस्वी साठे सरपोतदार यांना देण्यात येणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. याप्रसंगी अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘सप्त सूर माझे’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे, असे ‘राजहंस प्रतिष्ठान’चे अध्यक्ष सुहास कबरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:13 am

Web Title: sandeep acharya get rajhans award
Next Stories
1 ‘आयआरसीटीसी’ला ६०० कोटींचा झटका!
2 उमेदवाराच्या कामानुसार मतदान करा!
3 ‘झोपु’ प्रकल्पात लुडबुड नको
Just Now!
X