25 January 2021

News Flash

साने गुरुजींच्या पुस्तकातील मजकुरात फेरफार

‘आपले नेहरू’ पुस्तकाबाबत ‘अ‍ॅमेझॉन किंडल’चा हलगर्जीपणा

|| नमिता धुरी

पुस्तकातील माहितीत हवी तशी भर घालून तो मजकूर मूळ लेखकाच्या नावे खपवण्याचा प्रकार ‘आपले नेहरू’ या पुस्तकाबाबत घडला आहे. साने गुरुजींनी लिहिलेले हे पुस्तक ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर उपलब्ध आहे.मुंबई : पुस्तकातील माहितीत हवी तशी भर घालून तो मजकूर मूळ लेखकाच्या नावे खपवण्याचा प्रकार ‘आपले नेहरू’ या पुस्तकाबाबत घडला आहे. साने गुरुजींनी लिहिलेले हे पुस्तक ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर उपलब्ध आहे.साने गुरुजींनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या या पुस्तकात पंडित नेहरूंच्या निधनाची माहिती देताना, ‘२७ मे १९६४ हा दिवस भारताच्या इतिहासातील एक दुर्दैवी दिवस ठरला. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्याला सोडून गेले. दिल्लीला त्या दिवशी एक हलकासा धरणीकं पही जाणवला. जणू पृथ्वीनेही त्यांच्या मृत्यूचे दु:ख नोंदवले’, असा मजकू र छापण्यात आला आहे. मात्र, साने गुरुजींचे निधन १९५० साली झालेले असताना त्यांनी १९६४ सालच्या घटनेबद्दल आधीच कसे लिहून ठेवले, असा प्रश्न वाचक उपस्थित करत आहेत.  २०११ साली वध्र्याच्या उत्कर्ष प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्यातही हीच चूक होती. मात्र, १०० प्रती वितरित झाल्यानंतर ही चूक लक्षात आली, तेव्हा वितरण थांबवण्यात आल्याची माहिती उत्कर्ष प्रकाशनचे उत्कर्ष गवळी यांनी दिली. तो मजकूर अभिनंदन प्रकाशनच्या पुस्तकातून घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा एकदा वाचकांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर प्रकाशनाने एक पत्रक जाहीर करून दिलगिरी व्यक्त केली. ‘आपले नेहरू’ ही पुस्तिका आम्ही प्रकाशित केली होती. ‘काळाचे बोलावणे आणि चीनशी लढाई’ हे प्रकरण साने गुरुजींनी लिहिलेले नाही.

नेहरू यांचे अंतिम पर्व स्वतंत्रपणे घेतल्याचा उल्लेख नजरचुकीने राहून गेला, असे या पत्रकात म्हटले आहे.कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनाशी संपर्क  साधून ही चूक लक्षात आणून दिल्याचे साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे विश्वस्त गोपाल नेवे यांनी सांगितले. ‘अन्य प्रकाशकाच्या पुस्तकातून मजकूर घेतला होता. ही चूक अनवधानाने झाली आहे. पण नेवे यांना दिलगिरीचे पत्र देणार आहे’, असे अभिनंदन प्रकाशनचे त्रिभुवन जोशी यांनी सांगितले.झाले काय? : आपण काय प्रकाशित करत आहोत, हे एकदा तपासून पाहण्याची तसदी ‘अ‍ॅमेझॉन किंडल’ घेतलेली नाही. इतर प्रकाशकांनी प्रकाशित केलेला मजकूर सरसकट उचलून ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर प्रकाशित करण्यात आला आहे. याबाबत ई-मेलद्वारे संपर्क  साधला असता ‘अ‍ॅमेझॉन किंडल’कडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.साने गुरुजींच्या पुस्तकांचे हक्क २०१० साली खुले झाल्याने त्यांची पुस्तके  कोणीही प्रकाशित करू शकतो. मूळ पुस्तकात नेहरूंच्या तरुणपणापर्यंतचा मजकूर होता. त्यात कोणी तरी भर टाकून नेहरूंच्या निधनापर्यंतचा मजकूर छापला. परंतु अशा प्रकारे भर टाकत असताना त्यासंबंधीची सूचना पुस्तकात छापणे अपेक्षित आहे.  – विनोद शिरसाट, संपादक, साधना प्रकाशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 1:21 am

Web Title: sane guruji aaple nehru amazon kindle mppg 94
Next Stories
1 रुग्णसंख्या नियंत्रणात, तरीही कोविड केंद्रे सुरू
2 बांधकाम क्षेत्रातील सल्लागार, सर्वेक्षक, पर्यवेक्षकांच्या अनुज्ञापन शुल्कात वाढ
3 महाकाली लेण्यांची एक इंचही जागा सरकारला विकू देणार नाही – प्रविण दरेकर
Just Now!
X