News Flash

‘संघर्ष यात्रा’ पुन्हा वादात

मुंडे यांच्या कन्या पंकजा यांनी हरकत घेतल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयात्रा’ हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला असून दुसऱ्यांदा या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. साकार राऊत दिग्दर्शित हा चित्रपट गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलल्याचे कारण निर्मात्यांनी दिले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी १९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र मुंडे यांच्या कन्या पंकजा यांनी हरकत घेतल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. पंकजा यांनी  चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी विनंती बोर्डाला केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सेन्सॉर बोर्डाचे विभागीय अधिकारी राजू वैद्य यांनी ‘संघर्षयात्रा’ नावाचा कोणताही चित्रपट सेन्सॉरसाठी आला नसल्याचे सांगितले. ‘संघर्षयात्रा’ चित्रपटाबद्दल निर्माते लवकरच पंकजा यांची भेट घेणार असल्याचे समजते. याप्रकरणी निर्माते राजू बाजी आणि दिग्दर्शक साकार राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणतेही उत्तर मिळाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2016 12:20 am

Web Title: sangharsh yatra movie on gopinath munde
टॅग : Gopinath Munde
Next Stories
1 मुंबईत लोकलच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, संतप्त स्थानिकांचा रेलरोको
2 कलाकारांची पळापळ अन् सेल्फीमग्न प्रेक्षक!
3 वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांची भीती वाटतेय..
Just Now!
X