केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा एक भाग म्हणून सार्वजनिक स्वच्छतागृह, पालिका शाळा, पालिका कार्यालये आणि प्रसूतिगृहांमध्ये स्वयंचलित सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग यंत्र उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच या यंत्राच्या साहाय्याने सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाटही लावणे शक्य होणार आहे.
कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या महिलांची अनेक वेळा कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेऊनो सार्वजनिक स्वच्छतागृह, पालिका शाळा, पालिका कार्यालये आणि प्रसूतिगृहांमध्ये स्वयंचलित सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून ही यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शाळांमध्ये बसविण्यात येणाऱ्या यंत्रामुळे मुलींना विनामूल्य सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणार आहेत. मात्र सार्वजनिक स्वच्छतागृह, पालिका कार्यालये आणि प्रसूतिगृहांमध्ये या यंत्रामध्ये १० रुपयांचे अथवा एक रुपयांची दहा नाणी टाकल्यानंतर तीन सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होतील. अनेक वेळा ही नॅपकीन सार्वजनिक स्वच्छतागृहात टाकण्यात येतात. त्यामुळे मलवाहिनी तुंबून समस्या निर्माण होते. मात्र या यंत्रांमध्ये सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाटही लावण्याची व्यवस्था आहे.

99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा