अन्य रोगराईचा फै लाव रोखण्यासाठी फवारणी

मुंबई : रोगराईचा फैलाव होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वे लोअर परळ कारखान्याचे ड्रोनच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण करत आहे. दररोज १२ तासांत १५ लिटर औषधाची फवारणी के ली जात आहे. भारतात असा रेल्वेने पहिल्यांदाच प्रयोग के ल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.

पावसाळ्यात साचलेले पाणी, सांडपाणी, अस्वच्छता अशा ठिकाणी डासांची पैदास होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टाइफाइडसारखे रोग डोके  वर काढतात. रेल्वेच्या कारखान्यात तर मोठय़ा प्रमाणात सामान असते. यात लोकल गाडय़ा, त्यांना लागणारे अन्य साहित्य तसेच भंगाराचे सामान मोठय़ा प्रमाणात असते. त्यातच कारखान्यातून गटार, मल्लनिस्सारनवाहिनी जात असतात. अशा ठिकाणी डासांची पैदास होऊन अन्य रोगराईला निमंत्रणच दिले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच लोअर परळ कारखान्यात साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ सर्वत्र पसरला. त्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने कारखान्यानेच निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले.  त्यासाठी औषधाची फवारणी कर्मचाऱ्यामार्फत न करता ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कारखान्याच्या ज्या भागात कर्मचारी पोहोचू शकत नव्हता, तेथेही काही उंचीवर जाऊन फवारणी करण्यात आली.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे छत, गटार, मल्लनिस्सारनवाहिनी, पाण्याचे पाईप इत्यादी ठिकाणीही फवारणी होण्यास मदत झाली. कारखाना परिसरात ५०० मीटर उंचीवरून प्रत्येक दिवशी १२ तासांत १५ लिटर औषध फवारणी करण्यात आली. हे काम यापुढीही काही दिवस सुरूच राहणार असल्याचे सांगितले.