News Flash

उत्तर भारतीय ओबीसी समाजाला महाराष्ट्रात हवे आरक्षण-संजय निरुपम

मुख्यमंत्र्यांना संजय निरुपम यांच्यासह भेटले उत्तर भारतीय समाजाचे प्रतिनिधी मंडळ

संजय निरुपम (संग्रहित छायाचित्र)

उत्तर भारतीय ओबीसी समाज आणि अनुसूचित जाती-जमातींमधील प्रमुख जातींना आरक्षण दिले गेले पाहिजे अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संजय निरुपम यांच्यासह एक प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेटले त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या भेटीनंतर निरुपम आगे बढो च्या घोषणाही देण्यात आल्या.

उत्तर भारतीय ओबीसी समाज जसे कुर्मी, कोइरी, यादव, पाल, कनौजिया, चौरासिया, मौर्य, विश्वकर्मा या जातीचा ओबीसी समाज महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. मुंबईतही अनेकांचे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. त्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळाले पाहिजे अशीही मागणी निरुपम यांनी केली आहे.

काय मागण्या करण्यात आल्या?
उत्तर भारतीय ओबीसी समाजाला महाराष्ट्रात ओबीसी समाज म्हणून ओळख मिळावी

ओबीसी, एससी आणि एसटी समाजाच्या लोकांना जात प्रमाणपत्र देताना डोमेसाइल प्रमाणपत्र देण्याची अट ठेवण्यात यावी

जात प्रमाणपत्रासाठी पुरावे सादर करण्याची पूर्वीची प्रथा रद्द करावी आणि राज्यातले निवासी असल्याचे प्रमाणपत्र मागावे

उत्तर भारतीय ओबीसींना महाराष्ट्रातील ओबीसी म्हणून ओळख मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. जात प्रमाणपत्रासाठी पुरावे सादर करण्यासाठी १९५५ किंवा १९६५ ची पद्धत रद्द करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भातली लेखी मागणी करा त्यानंतर त्यावर विचार केला जाइल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 5:00 pm

Web Title: sanjay nirupam and mumbai congress demands quota for north indians
Next Stories
1 राज ठाकरे एम. एफ हुसैन यांचा वारसा चालवत आहेत का?, नेटकऱ्यांचा सवाल
2 लालबागच्या राजासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
3 इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांचा घटस्फोटासाठी अर्ज दाखल
Just Now!
X