राज ठाकरे यांनी मोदी यांच्या विरोधात भूमिका मांडल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे अशी युती होणार, अशी चर्चा सुरू झाली असली तरी काँग्रेस कदापि मनसेशी युती करणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे अशी युती होणार ही केवळ अफवा आहे. काँग्रेस नेहमीच समविचारी पक्षांशी आघाडी करतो. मनसे हा कोणताही विचार नसलेला पक्ष आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करणे हे त्यांचे काम आहे.  मनसेने गुजराती समाजाला लक्ष्य केल्याने सरकारने गुजराती समाजाला संरक्षण द्यावे, अशी मागणीही निरुपम यांनी केली.

विधान बालिश – तटकरे

पुण्यातील मुलाखत किंवा गेल्या आठवडय़ात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट यावरून राष्ट्रवादी मनसेशी युती करणार, हे  निरुपम यांचे विधान बालिश असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.