26 January 2021

News Flash

पंतप्रधान मोदींना अडाणी म्हणणारे संजय निरूपम ‘मानसिक रोगी’, भाजपाची टीका

''125 कोटी भारतीयांनी मोदींना निवडून दिलं असून, ते (निवडून देणारे) अशिक्षित आणि अडाणी नाहीयेत याचा कदाचीत निरूपम यांना विसर पडला असावा''

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अशिक्षित, अडाणी अशा शब्दांचा वापर करून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. भाजपा प्रवक्त्या शायना एनसी यांनी निरूपम यांच्यावर टीका करताना त्यांना मानसिक रोगी असल्याचं म्हटलं आहे. काल संध्याकाळी शायना एनसी यांनी ट्विटरद्नारे निरुपम यांच्यावर टीका केली आहे.

मानसिक रोगी संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा असभ्य टिप्पणी केली आहे. 125 कोटी भारतीयांनी मोदींना निवडून दिलं असून, ते (निवडून देणारे) अशिक्षित आणि अडाणी नाहीयेत याचा कदाचीत निरूपम यांना विसर पडला असावा, असं शायना एनसी यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. तर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही निरूपम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि सभ्य माणसाला न शोभणारे हे वक्तव्य असल्याची टीका त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते निरूपम –
पंतप्रधान मोदींवर काढण्यात आलेला चित्रपट मुलांना दाखवण्याचा प्रयत्न केला जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करताना निरूपम यांनी जी मुलं शाळा, महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांना मोदींसारख्या अशिक्षित, अडाणी व्यक्तीबाबत जाणून घेऊन काय मिळणार आहे ? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की आजही आमच्या देशातील नागरिक आणि मुलांना आमच्या पंतप्रधानांकडे कोणती पदवी आहे याचीच माहीत नाही, असे वक्तव्य संजय निरूपम यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 1:38 pm

Web Title: sanjay nirupam is mentally deranged slams bjp after his controversial statement on pm modi
Next Stories
1 नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत मल्ल्याला सोडणार नाही – धर्मेंद्र प्रधान
2 मल्ल्या लंडनला पळून जाणार हे अरुण जेटलींना आधीच माहित होतं – राहुल गांधी
3 घरचा आहेर ! विजय मल्ल्यानंतर स्वामींचे अरुण जेटलींवर गंभीर आरोप
Just Now!
X