News Flash

संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे नाही

राजीनामा राज्यपालांकडे पाठविण्यात न आल्याने राठोड हे अद्याप वनमंत्री असून या खात्याचा कार्यभार अन्य मंत्र्याकडे देण्यात आलेला नाही.

(संग्रहित छायाचित्र)

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राजीनामा दिल्याचे संजय राठोड यांनी रविवारी जाहीर केले. हा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाने अद्यापही राज्यपालांकडे पाठविलेला नाही. त्यामुळे हा राजीनामा कुठे आहे, तो तसबीर करण्यासाठी ठेवला आहे का, असा सवाल करीत भाजपने विधानसभेत  आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत या मुद्दय़ावर मौन बाळगले.

राजीनामा राज्यपालांकडे पाठविण्यात न आल्याने राठोड हे अद्याप वनमंत्री असून या खात्याचा कार्यभार अन्य मंत्र्याकडे देण्यात आलेला नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हा राजीनामा तसबीर करण्यासाठी ठेवला असेल,’ असा टोमणा मारत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 12:24 am

Web Title: sanjay rathore resignation is not yet with the governor abn 97
Next Stories
1 राज्यातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
2 मुदतवाढ त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतरच
3 २४ तास लसीकरणाबाबत राज्याकडून साशंकता
Just Now!
X