News Flash

“अग्रलेखात सडके, पादरे शब्द वापरण्यापेक्षा…”; संजय राऊतांवर भाजपाचा हल्लाबोल

'ईडी'च्या नोटीशीनंतर राऊत-भाजपा शाब्दिक युद्धाला जोर

पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यापासून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि भाजपा विरोधात टीकेचा सूर लावला आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसल्यानंतर ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं. याचे पडसाद उमटू लागले असून भाजपाच्या नेत्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि किरीट सोमय्या यांच्यानंतर आता आमदार अतुल भातखळकर यांनीही अग्रलेखातील मजकूरावरून राऊतांवर टीका केली.

अर्णब गोस्वामी यांची त्यांच्याच शो मध्ये ‘बोलती बंद’; चर्चेसाठी आलेल्या प्रवक्त्याने सुनावलं…

सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संपादक असलेल्या संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्द वापरण्यापेक्षा ईडीने नोटीस पाठवलेल्या प्रकरणातील ५५ लाखांच्या व्यवहारावर बोलायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. “कार्यकरींनी ७०० शब्दांच्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्द भांडार खुले करून विद्वत्तेचे प्रदर्शन केले आहे. (त्यापेक्षा) दोन ओळी त्या ५५ लाखांबद्दल खरडल्या असत्या, तर विषय संपला असता”, असे त्यांनी ट्विट केले. तसेच, ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलं. “अर्णबवर कारवाई होते तेव्हा ‘कायदा त्याचे काम करत होता’ आणि आता?”, असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये केला.

“…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; संजय राऊतांना टोला

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनीही ट्विट करून संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता निशाणा साधला. “प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!,” असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:06 pm

Web Title: sanjay raut of shivsena criticised slammed by angry bjp leader atul bhatkhalkar over ed notice issue vjb 91
Next Stories
1 बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिला मातोंडकर यांचा कंगनाला टोला
2 अकरावीसाठी अर्ज जास्त, तरीही जागा रिक्त
3 हवाई प्रवासामुळे प्रवाशांना घाम
Just Now!
X