‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे आठवे पर्व

श्रावणमास सरता-सरता सर्वाना आतुरता असते ती गणरायाच्या आगमनाची. चिंतेचे ढग दूर सारून अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. या उत्सवाचा उत्साह चोहीकडे संचारला आहे. याच उत्सवी वातावरणात महाराष्ट्रातील अनोखा दानयज्ञ गुरुवारी गणेश चतुर्थीपासून सुरू होत आहे. हा दानयज्ञ आहे ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचा.

pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

यंदा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे आठवे पर्व. समाजात विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात करून देणारा हा उपक्रम. कोणी साहित्य-संस्कृतीत अमूल्य योगदान देणारी, तर कोणी वंचितांचा आधारवड बनलेली. या सर्वच संस्था विविध क्षेत्रांतील उणिवा हेरून त्या दूर करण्यासाठी उभ्या राहिलेल्या. आपले काम नेटाने करत असताना आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या या संस्था. त्यांना पाठबळ देणे हे आपल्या साऱ्यांचे काम. गेल्या सात वर्षांत दानशूरांनी ते चोखपणे बजावले आहे. त्यात ‘लोकसत्ता’ची भूमिका माध्यम म्हणूनच.

या उपक्रमाद्वारे सामाजिक संस्थांची साखळी ‘लोकसत्ता’ने तयार केली. गेल्या सात वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रांतील ७२ संस्थांना या उपक्रमाद्वारे बळ मिळाले. यंदाही राज्यातील दहा संस्थांची ओळख या उपक्रमाद्वारे करून देण्यात येणार आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे या संस्थांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी यंदाही लाखो दानशूर मदतीचा हात देतील याची खात्री आहे.