डॉ. राणी बंग यांच्या हस्ते मंगळवारी सेवाव्रतींना धनादेश

विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींना पाठबळ देणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील संस्थांना दानशूरांनी यंदाही भक्कम पाठबळ दिले. या दानयज्ञाचा सांगता सोहळा मंगळवार, २० नोव्हेंबर रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध समाजसेविका डॉ. राणी बंग यांच्या हस्ते यंदाच्या १० संस्थांकडे धनादेश सुपूर्द क रण्यात येतील.

‘सर्वकोर्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे आठवे वर्ष. विविध क्षेत्रांतील सेवाभावी संस्थांना बळ देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाची सुरुवात केली. गणेशोत्सवात या संस्थांची माहिती या उपक्रमाद्वारे देण्यात येते. यंदाही राज्यभरातील दहा संस्थांच्या कार्याची ओळख या उपक्रमांतर्गत करून देण्यात आली.

विशेष मुलांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेली ‘सोबती पालक संघटना’, काश्मिरातील दहशतवादाने अनाथ झालेल्या चिमुकल्यांसाठी काम करणारे ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी भिडणारे यवतमाळचे ‘दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ’, वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे बार्शीचे ‘स्नेहग्राम’, भारतीय संगीताचा स्वरवारसा जपणारे सोलापूरचे ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’, नवीन पिढीवर विज्ञान संस्कार घडवणारे कुडाळचे ‘वसुंधरा विज्ञान केंद्र’, जखमी प्राण्यांसाठी झटणाऱ्या सिद्धार्थ व सृष्टी सोनवणेंचा ‘सर्पराज्ञी प्रकल्प’, अपंगांच्या पुनर्वसनाचे काम करणारी कोल्हापूरची ‘हेल्पर्स ऑफ हॅण्डिकॅप्ड’ संस्था, गतिमंद मुलांचे शिक्षण व रोजगार तसेच अशा मुलांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची फळी उभारणारी वाईची ‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’ आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक घडणीत मोठे योगदान दिलेली पुण्याची ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ अशा १० संस्थांच्या सेवाकार्याची ओळख यंदा करून देण्यात आली होती.

दर वर्षीप्रमाणे यंदाही वाचकोंनी या उपक्रमास भरभरू न प्रतिसाद देत या संस्थांना आर्थिक  पाठबळ दिले. सुमारे सव्वादोन कोटींचे अर्थबळ उभे करून वाचकांनी या संस्थांच्या कामाला दाद दिली आहे. एक प्रकारे हा दानयज्ञच. त्याची सांगता २० नोव्हेंबरला समारंभपूर्वक  करण्यात येणार आहे.

  • कुठे? – दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाटय़गृहाशेजारी, माटुंगा, मुंबई</li>
  • वेळ?- सायंकोळी ५ वाजता.
  • कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.