News Flash

५८ वर्षांचा नवरा आणि २० वर्षांची नवरी?

ठाण्यात राहण्या-या सतीश आपटे यांनी लीसा नावाच्या मुलीशी गुरुवारी विवाह केला.

| January 2, 2015 04:24 am

ठाण्यात राहण्या-या सतीश आपटे यांनी लीसा नावाच्या मुलीशी गुरुवारी विवाह केला. ही काही मोठी गोष्ट नाही. कारण, देशभरात किती तरी जण लग्न करतात. सतीश आणि लिजा यांनी १ जानेवारी २०१५रोजी विवाह केला. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ तारखेला लग्न करणं हीसुद्धा काही मोठी गोष्ट नाही की हे दाम्पत् चर्चेचा विषय बनून त्यांच्या लग्नातला फोटो हा सोशल मिडियावर व्हायरल व्हावा.
satishs-apte-wedding-s-650_010215121511
या लग्नाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सतीश आपटे आणि त्यांची पत्नी लीसा हीचे वय. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, सतीश आपटे हे ५८ वर्षांचे असून नुकतेच तारुण्यात पाऊल टाकलेली लिसा ही २० वर्षांची आहे. लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर त्यांनी काढलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर नववर्षाच्या शुभेच्छांसह काही व्हायरल झालं असेल ते म्हणजे लग्नानंतर सतीश आणि लिसा यांचा सेल्फी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 4:24 am

Web Title: satish apte wedding image goes viral
टॅग : Social Media
Next Stories
1 नवी मुंबईत वाहतुकीची कारवाई ई-चलन पद्धतीने
2 ‘महावितरण’चा १२% वीजदरवाढीचा प्रस्ताव
3 मुंबईकर सुधारले!
Just Now!
X