News Flash

एकवेळचा छोटा-मोठा चोर असा बनला शार्प शूटर सतीश काल्या

पत्रकार जे.डे. हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनबरोबर आणखी एक नाव चर्चेत आले ते म्हणजे रोहित जोसेफ थंगप्पन उर्फ सतीश काल्या. राजन टोळीचा शार्प शूटर

पत्रकार जे.डे. हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनबरोबर आणखी एक नाव चर्चेत आले ते म्हणजे रोहित जोसेफ थंगप्पन उर्फ सतीश काल्या. राजन टोळीचा शार्प शूटर असलेल्या या सतीश काल्यानेच जे.डे. यांच्यावर पाच गोळया झाडल्या. अंडरवर्ल्डमध्ये सतीश काल्या म्हणून नावारुपाला येण्याआधी १९९८ पर्यंत सतीश काल्या एक छोटा-मोठा गुन्हेगार होता. चोरी-दरोडयाचे आरोप त्याच्यावर होते. मूळचा केरळचा असणारा हा रोहित थंगप्पन बांद्रा खेरवाडी येथे राहायला होता.

गुन्हेगारी जगतात त्याचा फारसा दबदबा नव्हता. पण दरोडयाच्या एका प्रकरणात तो तुरुंगात गेला आणि त्याचे नशीब पालटले. तिथे त्याची ओळख डी.के.राव उर्फ बोराशी झाली. डी.के.राव हा छोटा राजनचा अत्यंत विश्वासू साथीदार होता. तुरुंगात थंगप्पनच्या शूटिंग कौशल्याची माहिती डी.के.रावच्या कानावर पडली. त्यानंतर रावने रोहित थंगप्पनशी मैत्री वाढवली. रावनेच रोहित थंगप्पनबद्दल छोटा राजनला सांगितले.

अल्पावधीत रोहित थंगप्पनने राजनचा विश्वास संपादन केला व हळूहळू सतीश काल्या म्हणून त्याने अंडरवर्ल्डमध्ये ओळख बनवली. राजन टोळीसाठी तो महत्वाची कामे करु लागला. जे.डे. यांच्या हत्येच्या काही महिने आधी त्याची जामिनावर सुटका झाली होती. राजनने जेव्हा फोन केला तेव्हा सतीश काल्या केरळमध्ये होता. जे.डे. यांच्या हत्येसाठी राजनने त्याला मुंबईला बोलावून घेतले.

स्काईपवरुन बोलताना राजनने त्याला जे.डे. यांचे वर्णन, त्यांच्या मोटारसायकलचा नंबर याची माहिती दिली. पवई हिरानंदानी रोडवर सतीश काल्याने बाईकवरुन चाललेल्या जे.डे. यांच्यावर पाच गोळया झाडल्या. त्यातल्या तीन गोळयांनी जेडेंच्या शरीराचा वेध घेतला. सतीश काल्या खूप चतुर आहे असे पोलिसांनी सांगितले. जे.डे. यांच्या हत्येबद्दल मला खंत आहे ते पत्रकार आहेत हे मला माहित असते तर मी त्यांची हत्या केली नसती असे त्याने पोलिसांना सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 6:31 pm

Web Title: satish kalya jyotirmoy dey murder case
Next Stories
1 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईंचे नाव; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
2 सरकारी योजनेत एका पेक्षा जास्त घर घेण्याचा अधिकार कोणालाही नको: हायकोर्ट
3 अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
Just Now!
X