News Flash

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी सतीशचंद्र माथूर

सोमवारी राज्याच्या गृह विभागाकडून या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले

satish_mathurपुण्याचे माजी पोलीस आयुक्त सतीशचंद्र माथूर यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी राज्याच्या गृह विभागाकडून या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. सतीशचंद्र माथूर यांची पुण्यातून बदली करताना त्यांच्याकडे राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालकपद देण्यात आले होते. त्यावेळीच विजय कांबळे यांच्याकडे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद देण्यात आले होते. कांबळे यांच्या निवृत्तीनंतर या पदावर सतीशचंद्र माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:57 pm

Web Title: satish mathur appointed as dg of acb
Next Stories
1 गडचिरोलीत नक्षल्यांकडून दोन आदिवासींची गोळ्या घालून हत्या
2 …तर विदर्भ आंदोलनाला हिंसक वळण लागेल- श्रीहरी अणे
3 शस्त्रक्रियेनंतर बीडमध्ये पाच जणांची दृष्टी अधू
Just Now!
X