News Flash

ठाण्यात शनिवारी साहित्य, संगीतमय मैफल

चंद्रकांत काळे या कार्यक्रमाबाबत बोलताना म्हणाले, की मराठी साहित्यविश्वात पु. ल. देशपांडे हे ख्यातकीर्त विनोदी लेखक म्हणूनच प्रसिद्ध आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

‘आणखी पु. ल.’ विशेषांक प्रकाशनाच्या निमित्ताने..

‘लोकसत्ता’तर्फे शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त ‘शब्दवेध’ निर्मित ‘अपरिचित पु. ल.’ हा साहित्य, संगीतमय कार्यक्रम रंगणार आहे. ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस रोड, येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणारा हा विशेष कार्यक्रम सर्वासाठी खुला असणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन, गायक-अभिनेते चंद्रकांत काळे यांचे असून, संगीत नरेंद्र भिडे यांचे आहे. कलावंत आहेत चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर. साथसंगत आहे आदित्य मोघे आणि अपूर्व द्रविड यांची.

चंद्रकांत काळे या कार्यक्रमाबाबत बोलताना म्हणाले, की मराठी साहित्यविश्वात पु. ल. देशपांडे हे ख्यातकीर्त विनोदी लेखक म्हणूनच प्रसिद्ध आहेत. पु.ल. हे अष्टपैलू कलावंत म्हणून जसे ओळखले जातात तसेच हे अष्टपैलुत्व त्यांच्या लेखनातूनही आपल्याला आढळून येते. विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी चिंतनात्मक, गंभीर स्वरूपाचे, तरल काव्यात्मक, रसरशीत प्रवास-वर्णनात्मक लेखन केलेले आहे. ‘अपरिचित पु. ल.’ या कार्यक्रमात विनोदाबरोबरच अशाच  काही लेखनाचे दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच पुलंच्या काही कविताही या कार्यक्रमात गीत स्वरूपात गायल्या जाणार आहेत. खोगीरभरती, अघळपघळ, हसवणूक, गाठोडं, उरलसुरलं, मी एक शून्य, इ.ललित संग्रहातील लेखनावर आधारित हा कार्यक्रम आहे. अर्थातच पुलंचं जे साहित्य खूप लोकप्रिय आणि गाजलेले आहे, ज्यावर आधीच काही सादरीकरण झालेलं आहे ते या कार्यक्रमात टाळण्यात आले आहे. म्हणूनच त्याचे नाव ‘अपरिचित पु. ल.’ असे असून, ‘आणखी पु. ल.’च्या प्रकाशनानिमित्त रसिकांना या कार्यक्रमाचाही लाभ होणार आहे.

कधी – शनिवार,  ३० नोव्हेंबर

कुठे – हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस रोड, ठाणे (पश्चिम)

वेळ – सायंकाळी साडेसहा वाजता

मुख्य प्रायोजक  – परांजपे स्कीम्स

सहप्रायोजक –  चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 4:00 am

Web Title: saturday a literary musical concert in thane akp 94
Next Stories
1 सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणे बंद!
2 शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम
3 राज्यात कांद्याची  विक्रमी दरझेप
Just Now!
X