19 September 2020

News Flash

‘कॅम्पा कोला’तील रहिवाशांना चार आठवड्यांची अखेरची मुदत

वरळीतील कॅम्पा कोलातील अनधिकृत मजल्यांवर राहणाऱया रहिवाशांना सदनिका रिकामी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चार आठवड्यांची अखेरची मुदत दिली.

| October 1, 2013 02:31 am

वरळीतील कॅम्पा कोलातील अनधिकृत मजल्यांवर राहणाऱया रहिवाशांना सदनिका रिकामी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चार आठवड्यांची अखेरची मुदत दिली. अनधिकृत बांधकाम पाडण्यास मुदतवाढ देण्यासाठी कॅम्पा कोलातील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांच्या मुदतीशिवाय अन्य कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. 
याआधी कॅम्पा कोलातील रहिवाशांनी बांधकाम पाडण्यास दिलेली मुदत वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावून दिलासा देण्याची विनंती केली. परंतु न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्ट करीत रहिवाशांना दिलासा देण्यास नकार दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:31 am

Web Title: sc grants four weeks time for vacation of campa cola housing society
Next Stories
1 आता संक्रमण शिबिरे नाहीत
2 व्हिडिओ ब्लॉग : अमेरिकी सरकारचे आर्थिक कामकाज ठप्प
3 डॉकयार्ड इमारत दुरुस्तीच्या विलंबाला पालिका जबाबदार
Just Now!
X