24 November 2020

News Flash

सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटात घोटाळा?

‘कंत्राट मंजूर झाल्यास महापालिकेला ४० कोटींचा फटका’

‘कंत्राट मंजूर झाल्यास महापालिकेला ४० कोटींचा फटका’

मुंबई :पालिकेच्या रुग्णालयांसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्यासाठी पालिका प्रशासनाने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत घोटाळा असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. हे कंत्राट स्थायी समितीने मंजूर केल्यास पालिकेला ४० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे भाजपच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर येणार आहे.

तब्बल सहा महिन्यांनी बुधवारी स्थायी समितीची बैठक होणार असून एकाच वेळी ६७४ प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेवर आणल्यामुळे ही सभा आधीच वादग्रस्त ठरली आहे. पालिकेशी संबंधित कोटय़वधींच्या प्रस्तावांचा यात समावेश असल्यामुळे भाजपने आधीच एकत्रित प्रस्ताव आणण्यास विरोध केला होता. या प्रस्तावांमध्ये अनेक मोठमोठय़ा कंत्राटांसंबंधीचे प्रस्ताव असून त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

या ६७४ प्रस्तावांमध्ये सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीच्या कंत्राटाबाबतचाही एक प्रस्ताव आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी तीन वर्षांसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये २२१ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. पालिकेत सध्या असलेल्या ईगल सिक्युरिटी अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस या कंपनीने निविदा भरल्या आहेत. तसेच सीआयएस ब्युरो फॅसिलिटी सव्‍‌र्हिसेस या कंपनीनेही निविदा भरल्या आहेत. सीआयएस ब्युरो ही कंपनी मोठी असून या कंपनीची उलाढाल ३७० कोटींची आहे. तसेच या कंपनीला विविध प्राधिकरणांमध्ये मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव आहे. मात्र या कंपनीने प्रथमच पालिकेसाठी निविदा भरल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाने सीआयएस ब्युरोला कोणतेही कारण न देता अपात्र ठरवून ईगलला हे कंत्राट देण्याची शिफारस केली. त्यामुळे पालिकेला ४० कोटींचा फटका बसणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे. मात्र या प्रकरणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केली.

६७४ प्रस्ताव

बुधवारी स्थायी समितीसमोर येणाऱ्या ६७४ प्रस्तावांमध्ये बेस्टच्या अनुदानाचा विषय, प्रभागांच्या स्तरावर केलेल्या खर्चाला मंजुरी, पदोन्नतीचे विषय, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ मुखपट्टय़ांची खरेदी, रुग्णालयांसाठी पीसीआर औषधी किटची खरेदी, करोनाबाबतच्या जनजागृतीसाठी जाहिराती करण्याकरिता कंत्राट, विविध पालिका शाळांच्या पुनर्बाधणीचे कंत्राट, कचरा वाहून नेण्यासाठी गाडय़ा भाडय़ाने घेण्याचे कंत्राट, नाल्यांचे रुंदीकरण, नाल्यांवर आच्छादन करणे असे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे यावर चर्चा करून विषय मंजूर करणे आवश्यक असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 2:08 am

Web Title: scam in private security guards contract for municipal hospitals zws 70
Next Stories
1 नगरसेवकांच्या कामगिरीत शिवसेनेची घसरण
2 करोनामुळे नवरात्रीत वाद्यवृदांवर संक्रांत
3 वाहने चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय
Just Now!
X