01 March 2021

News Flash

“आधी हात जोडून आणि नंतर…”; शाळांच्या फी वाढीवरुन राज यांचा ठाकरे सरकारला इशारा

विद्यार्थी-पालक, कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने घेतली राज यांची भेट

विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज मुंबईमधील कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी फी वाढीवरुन मनसे स्टाइल खळखळट्याक् आंदोलन करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला. “पहिलं आपण सरकारशी हात जोडून आणि नंतर सोडून बोलू,” असं आश्वासन राज यांनी पालक आणि कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना दिलं आहे.

राज्यातील ग्रथांलये सुरु केल्यानंतर कोचिंग क्लासेस आणि इतर शालेय उपक्रम सुरु करावेत यासाठी पालक चांगलेच आक्रमक झाले असून याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी-पालक समन्वय समितीबरोबरच कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या एका शिष्ठमंडळ आज राज ठाकरेंच्या भेटीला गेलं होतं. यावेळी राज यांनी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर थेट राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावल्याचे वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. वर्षा गायकवाड यांनी आज संध्याकाळी यासंदर्भात बैठक असून याबद्दल उद्यापर्यंत कळतो, अशी माहिती राज यांना दिली.

शालेय फी वाढीचा मुद्दा घेऊन अनेक पालक आज राज यांच्या भेटीला आले होते. राज्य सरकारने काढलेल्या शासन आदेशानंतरही काही शाळांनी फी वाढ केल्याचे, पालकांनी राज यांच्या निदर्शनास आणून दिलं. या भेटीदरम्यान अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर पालकांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार?, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं कसं होणार?, काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, त्याचं काय होणार अशा अनेक मुद्द्यांवर पालकांनी राज यांच्याशी चर्चा करुन यासंदर्भात पाठपुरावा करण्याची मागणी केली.

त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेस सुरु करावेत, या मागणीसाठी आज कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांचे शिष्टमंडळही राज ठाकरेंना भेटलं. याच बैठकीनंतर राज यांनी थेट शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. उद्यापर्यंत यासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते याबद्दल कळवलं जाईल असं शिक्षणमंत्र्यांनी राज यांना सांगितलं आहे.

मागील काही आठवड्यांमध्ये कृष्णकुंजवर जाणाऱ्यांमध्ये जिम चालक, डबेवाले, मूर्तीकार, ग्रंथालय मालक आणि कोळी महिला यांचाही समावेश आसल्याचे दिसून आलं. विशेष म्हणजे यापैकी अनेकांना राज यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांमध्ये दिसादायाक वृत्त मिळाल्याचंही दिसून आलं. आता पालक, विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेस मालकांनाही असा दिलासा मिळतो का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 5:33 pm

Web Title: school fees hike issue raj thackeray warns maha gov that we will deal with issue in our style scsg 91
Next Stories
1 मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५,५०० रुपये बोनस जाहीर
2 ‘एमआयएम’च्या आमदारांचा घातक खेळ, देश विघातक षडयंत्राची कसून चौकशी झाली पाहिजे – भातखळकर
3 मुंबई: ४० हजाराची सोनसाखळी चोरली, तिने चोराला पकडण्यासाठी धावत्या बसमधून मारली उडी
Just Now!
X