ऐरोली सेक्टर ८ ए मधून फरनिशाला सोफा फरनासिकावेझ या आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचे सोमवारी सायंकाळी अपहरण करण्यात आले. न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये ही मुलगी तिसऱ्या इयत्तेत शिकते. फरनिशाला ही शाळेतून सुटून राहत्या घरी जाण्यासाठी एकविरा दर्शन सोसायटीच्या आवारात गेल्यांनतर अज्ञात इसमाकडून तिला पळून नेण्यात आले. यांसदर्भात रबाले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली असून ती आढळल्यास रबाले पोलीस ठाण्यात ०२२-३२९०१०१६ किंवा पोलीस निरीक्षक दिलीप जगदाळे ८४२४०७१७१२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.