News Flash

अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य शाळांना देणे गरजेचे!

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांचे मत

(संग्रहित छायाचित्र)

कोणत्याही एका अभ्यास मंडळाने निश्चित करून दिलेला चाकोरीबद्ध अभ्यासक्रम लादण्यापेक्षा स्थानिक शाळा किंवा शिक्षकांना अभ्यासक्रम निवडीचे, शिकविण्याच्या पद्धतीचे आणि आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास शिक्षणाचा दर्जा नक्कीच सुधारू शकेल. व्यवस्थेने आखून दिलेला चाकोरीबद्ध अभ्यासक्रम शिकविणे हे उद्दिष्ट नसून मुलांना शिक्षण देणे हा खरा उद्देश असल्याचे मत नोबेल पारितोषिक विजेते प्रा.अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

‘प्रथम’ संस्थेच्या २५ वर्षपूर्तीच्या निमित्ताने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षण क्षेत्रातील नामांकित मंडळी उपस्थित होती.

भारतातील शिक्षणक्षेत्रातील त्रुटी मांडत १९९५ साली पालिकेच्या शाळांमध्ये केलेल्या यादृच्छिक नियंत्रण-प्रयोग (आरसीटी- रॅण्डमाइज कंट्रोल ट्राय) संशोधन पद्धतीचे महत्त्व प्रा. बॅनर्जी यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले, ‘शिक्षण हे शाळेचे आवार, शिक्षकांची संख्या, पायाभूत सुविधा-साधने यावर पूर्णत: अवलंबून नाही. त्यामुळे सरसकट एकच सूत्र न लावता आरसीटीसारख्या संशोधनात्मक पद्धतीने नेमकी कशाची गरज आहे, हे पडताळून त्यानुसार शाळांमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.

शिक्षणातील आर्थिक सुधारणां-ऐवजी केंद्राने अनुदान आयोग, मनुष्यबळ विकास आणि अभ्यासक्रमाच्या सुधारणांवर भर देणे गरजेचे आहे. शिक्षणावरील निधी हा राज्याचा विषय असून त्यामध्ये केंद्राचा सहभाग तुलनेने कमी आहे. त्यामुळे राज्यांनी सकारात्मक पावले उचलली तर सरकारी शाळा खासगी शाळांपेक्षाही अधिक चांगल्या रीतीने घडवू शकतात. दिल्लीतील सरकारी शाळा याचे उत्तम उदाहरण आहेत. देशात सध्या सुरू असलेल्या संशोधनात्मक अभ्यासाला योग्य दिशा देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:26 am

Web Title: schools should be given the freedom of choice abn 97
Next Stories
1 ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणारा ‘माणदेशी महोत्सव’
2 मुद्रांक शुल्कात लवकरच वाढ
3 एसटीचे ‘बसतळ’ चार वर्षांनंतरही कागदावरच!
Just Now!
X