News Flash

अध्यात्मातील विवेकातूनच विज्ञानाची प्रगती- भटकर

विज्ञान, तंत्रज्ञानाची कितीही झपाटय़ाने प्रगती होत असली तरी त्याच्या मुळाशी अध्यात्म आहे. हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती वेद-उपनिषदांच्या आधारे चालत आहे

| December 23, 2013 01:51 am

विज्ञान, तंत्रज्ञानाची कितीही झपाटय़ाने प्रगती होत असली तरी त्याच्या मुळाशी अध्यात्म आहे. हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती वेद-उपनिषदांच्या आधारे चालत आहे. या अध्यात्मात विवेक भरला आहे. आता विज्ञानाच्या प्रगतीत विकृती आली आहे. युवाशक्तीचा कौशल्याने वापर करून विज्ञानातील प्रगतीत अध्यात्मातील विवेकाचा वापर केला नाही, तर एकविसावे शतक हे शेवटचे शतक असेल, अशी भीती ज्येष्ठ वैज्ञानिक, पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी रविवारी येथे व्यक्त केली.
चतुरंग रंगसंमेलनात डॉ. विजय भटकर यांना निवृत्त वायुदल प्रमुख अनिल टिपणीस यांच्या हस्ते ‘चतुरंग जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. स. वा. जोशी विद्यालयातील शं. ना. नवरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमाला उद्योजक दीपक घैसास, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. सुभाष देव, भानू काळे उपस्थित होते. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जगात विज्ञान-तंत्रज्ञानात झपाटय़ाने प्रगती होत आहे. या प्रगतीमध्ये विकृती डोकावूलागली आहे. संस्कृतीचा अभाव व विज्ञानातील अर्धवट ज्ञानामुळे हे प्रयोग होत आहेत. ही विकृती रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम अध्यात्मावर उभी असलेली भारतीय संस्कृतीच करू शकते. अध्यात्मातील विवेकातून विज्ञान प्रगती करण्याचे मोठे आव्हान यापुढे भारतीय अभियंत्यांवर आहे. संस्कृती, वेदाचा अभ्यास, जमिनीवर पाय ठेवून हे काम साध्य झाले तर पुढच्या शतकाची आपण वाट पाहू शकतो, अन्यथा विज्ञानातील विकृतीमुळे २१वे शतक हे शेवटचे शतक ठरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ज्ञान आणि विज्ञान हे अध्यात्मामध्ये समांतर रेषेवर आहेत. याच आधारावर परम संगणकाची निर्मिती झाली. परम संगणकामुळे आपण अवकाश मोहिमा, लष्करी प्रगती, भ्रमणध्वनी, संगणकांमधील प्रगती पाहत आहोत. या परम संगणकाच्या निर्मितीमध्ये ज्ञान, विज्ञान, संस्कृती आणि सेवा हे कानोकानी भरलेले आहे. विज्ञानातील हे अध्यात्म जगापुढे
नेण्याची आता गरज आहे, असे डॉ. भटकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:51 am

Web Title: science develops from spiritual discernment bhatkar
टॅग : Science 2
Next Stories
1 एक्सलन्स के पिछे भागो, सक्सेस अपने आप पिछे आएगा
2 नरिमनपेक्षा बीकेसीचा भाव वधारला
3 राष्ट्रवादीचा ‘व्होट फॉर भारत’चा नारा
Just Now!
X