18 January 2018

News Flash

पानसिंग, बर्फी आणि कहानीने ‘स्क्रीन’ गाजवले

पठडीतल्या सिनेमांपेक्षा हटके, प्रयोगशील आणि तरीही प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या पानसिंग तोमर, बर्फी आणि कहाणी या चित्रपटांनी १९व्या कलर्स स्क्रीन पुरस्कार सोहळय़ांत बाजी मारली.

एक्स्प्रेस वृत्तसेवा, मुंबई | Updated: January 13, 2013 3:03 AM

पठडीतल्या सिनेमांपेक्षा हटके, प्रयोगशील आणि तरीही प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या पानसिंग तोमर, बर्फी आणि कहाणी या चित्रपटांनी १९व्या कलर्स स्क्रीन पुरस्कार सोहळय़ांत बाजी मारली.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानात शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या भव्यदिव्य सोहळय़ात ‘पानसिंग’ने सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला. तर याच चित्रपटासाठी इरफान खान आणि ‘बर्फी’तील अभिनयासाठी रणबीर कपूर यांनी संयुक्तरित्या सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. ‘कहानी’तील गरोदर महिलेची भूमिका रेखाटणाऱ्या विद्या बालनने सलग चौथ्यांदा ‘स्क्रीन सवरेत्कृष्ट अभिनेत्री’च्या पुरस्कारावर कब्जा केला.
भारतीय सिनेमाचे १०० वे वर्ष म्हणून संस्मरणीय ठरलेल्या २०१२ वर्षांतील चित्रपटांचा ‘स्क्रीन पुरस्कार सोहळा’ शनिवारी अत्यंत दणक्यात साजरा झाला. शाहरूख खानचे खुमासदार सूत्रसंचालन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, प्रियांका चोप्रा यांचे थिरकायला लावणारे नृत्य आणि रणबीर कपूर-नितू सिंग यांचा एकत्रित परफॉर्मन्स अशा एकाहून एक सादरीकरणांनी या सोहळय़ाची शान वाढवली.
 पुरस्कारांच्या शर्यतीत बाजी मारली ती बर्फी, पानसिंग तोमर आणि कहानी या चित्रपटांनी. पानसिंग तोमरने सवरेत्कृष्ट चित्रपट आणि सवरेत्कृष्ट अभिनेता हे मानाचे पुरस्कार मिळवले. तर सवरेत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शनासह संगीतासाठी पुरस्कार मिळवत ‘बर्फी’ने आपली छाप सोडली.
‘तलाश’मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर अभिषेक बच्चन (बोलबच्चन) आणि अन्नू कपूर (विकी डोनर) यांनी सवरेत्कृष्ट विनोदी अभिनेत्याच्या शर्यतीत संयुक्तरित्या बाजी मारली.

First Published on January 13, 2013 3:03 am

Web Title: screen award festival fuss by pansing barfi and khani
  1. No Comments.