मुंबईतल्या धारावीत आजपासून स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी १५० डॉक्टरांची टीम कार्यरत आहेत. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे हे सगळे सदस्य आहेत. मुंबई महापालिकेच्या सहाय्याने हे स्क्रिनिंग केले जाते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मुंबईतील धारावीत आत्तापर्यंत ४ रुग्णांचा बळी गेला आहे. धारावी ही दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी आता तातडीने स्क्रिनिंग सुरु करण्यात आलं आहे. मुंबईकरांना सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

करोनाची लागण झाल्याने धारावीत आत्तापर्यंत ४ जणांचा बळी गेला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजण्याचे प्रयत्न मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडून सुरु आहेत.