21 November 2017

News Flash

दुसरे ‘बोफोर्स’!

* हेलिकॉप्टर कंत्राटासाठी ३६२ कोटींची लाच भारतीय प्रतिनिधींना दिली * इटलीच्या सरकारी कंपनीच्या प्रमुखाला

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: February 13, 2013 4:30 AM

*  हेलिकॉप्टर कंत्राटासाठी ३६२ कोटींची लाच भारतीय प्रतिनिधींना दिली
* इटलीच्या सरकारी कंपनीच्या प्रमुखाला लाच दिल्याप्रकरणी अटक
इटलीच्या सरकारी मालकीच्या विमाननिर्मिती कंपनीचा मालक जोजफ ओर्सी याला लाच दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी सरकारतर्फे २०१० मध्ये नोंदविण्यात आलेल्या हेलिकॉप्टरच्या मागणीचे कंत्राट इटलीच्या कंपनीलाच मिळावे म्हणून सुमारे ३६२ कोटी रुपयांची लाच ओर्सी याने दिली असल्याचा आरोप आहे. या नव्या ‘बोफोर्स’च्या सीबीआय चौकशीचे आदेश केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी दिले आहेत.
भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य तत्सम अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी भारतीय हवाई दलाला हेलिकॉप्टरची गरज होती. फेब्रुवारी २०१०मध्ये यासाठी १२ हेलिकॉप्टरांची खरेदी करण्याच्या निविदा भारत सरकारने काढल्या. हे कंत्राट फिनमेक्कानिका या इटली सरकारच्या मालकीच्या कंपनीचीच सहकारी कंपनी असलेल्या ऑगस्टावेस्टलँड या कंपनीला मिळाले. तीन इंजिने असणाऱ्या एडब्ल्यू- १०१ या १२ हेलिकॉप्टरांच्या मागणीसाठी भारत सरकारने तब्बल ३६०० कोटी रुपये मोजण्याचे ठरले. या मागणीपैकी तीन हेलिकॉप्टर भारतात आली. मात्र ओर्सी यांच्या अटकेनंतर या करारास भारत सरकारने तातडीने स्थगिती आदेश दिले आहेत.

First Published on February 13, 2013 4:30 am

Web Title: second bofors
टॅग Bofors,Cbi,Helicopters