रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला रेल्वे अर्थसंकल्प हा रेल्वेला वास्तवाच्या रुळावर आणणारा असून, रेल्वेत क्रांती घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचा दावा सत्ताधारी करत असले तरी रोज सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींमुळे प्रवासी मात्र बेजार झाले आहेत. ऐनगर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे रडगाणे काही नवीन नाही. मात्र गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांना एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. सीएसटीहून कल्याणला सुटणाऱ्या रात्रीच्या ७.३३ च्या लोकलमध्ये ‘फर्स्ट क्लास’ महिला डब्यात ‘सेकंड क्लास’ची आसन व्यवस्था असल्याने महिला प्रवाशांमध्ये आपण योग्य डब्यात चढलो ना? असा संभ्रम निर्माण होऊन गोंधळ उडत आहे. त्याचबरोबर डब्यातील गर्दीला सामोरे जावे लागत आहे. ‘फर्स्ट क्लास’साठीचे पैसे मोजूनदेखील ‘सेकंड क्लास’च्या आसन व्यवस्थेवर बसून प्रवास करावा लागत असल्याची तक्रारही काही महिला प्रवाशांनी केली आहे.

'फर्स्टक्लास'च्या महिला डब्यात 'सेकंड क्लास' डब्याची आसन व्यवस्था. (छाया- मंजुषा दामले.)
‘फर्स्टक्लास’च्या महिला डब्यात ‘सेकंड क्लास’ डब्याची आसन व्यवस्था. (छाया- मंजुषा दामले.)