प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी कटऑफ यादी अनेक महाविद्यालयांमध्ये केवळ दोन ते तीन टक्क्यांनी खाली आल्याने अनेकांची मनाजोगत्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे. काही महाविद्यालयांनी काही अभ्यासक्रमांच्या सर्वच जागा भरल्याचे जाहीर केले आहे.
बारावीच्या वाढलेल्या निकालामुळे बहुतांश जागा ‘इनहाऊस’ भरल्या गेल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी फारच कमी झाल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर जाहीर झालेल्या दुसऱ्या कटऑफ यादीने उरलीसुरली आशाही मावळली. काही महाविद्यालयांची कटऑफ केवळ काही गुणांनी खाली आलीहोती. ‘एचआर’मध्ये बीबीआयच्या जागा भरल्या असून तिसरी यादी जाहीर होणार नाही, हे महाविद्यालयाने आत्ताच जाहीर करून टाकले आहे. एनएममध्येही काही अभ्यासक्रमांमध्ये तिसरी यादी लागण्याची शक्यता कमी आहे.
(काही महाविद्यालयांची पहिली आणि दुसरी कटऑफ चौकटींत)

रुईया
बीए- ९०.९२ वरून ८८% (इंग्रजी), ६३.८५ वरून ४७.०८% (मराठी) बीएस्सी- ७८.७७ वरून ७१.०८%, ८९.६ वरून ८३.०९% (बायोटेक्नॉलॉजी), ८२.१५ वरून ७५% (बायोकेमिस्ट्री), ७८.३१% वरून ७४.४०%(कम्प्यु.सायन्स),
बीएमएम- ८८ वरून ८४.१७% (कला), ९०.९२ वरून ८६.४०% (विज्ञान), ९०.७७ वरून ८७.६०% (वाणिज्य).

एनएम
बीकॉम- ९५.८० वरून ९५.१७%
बीएमएस ९५.९२ वरून ९५.८०% बीएएफ ९५.५० वरून ९३.१७% बीएस्सी ७० (आयटी) वरून ६६%

एचआर
बीएमएस (कला)- ९४ वरून ९२% बीएमएस (वाणिज्य)- ९५.८० वरून ९५.२०% बीएमएस (विज्ञान)- ९५.२० वरून ९५%
बीएमएम (कला)- ९३.८० वरून ८९.०८% बीएमएम (वाणिज्य)- ९३.८० वरून ९३.२३% बीएमएम (विज्ञान)- ९५.२० वरून ९२.४०% बीकॉम- ९५ वरून ९२.५० टक्के  बीएएफ ९५.५४ वरून ९५% बीएफएम ९४.४०वरून ९३.५० टक्के

केसी
बीएमएम(कला)- ९३.६ वरून ९०.१५% बीएमएम (वाणिज्य)- ९३.८ वरून ९२.४% बीएमएम (विज्ञान)- ९३.८ वरून ९०.४%
बीएमएस (कला)- ९३.६ वरून ८६.१५ बीएमएस (वाणिज्य)- ९४ वरून ९२.८ बीएमएस (विज्ञान)- ९२ वरून ९१.२%
बीएस्सी-आयटी- ८० (गणित) वरून ७८% बीएएफ- ९३ वरून ९१.६ बीबीआय- ८७ वरून ८३ बीएफएम- ९०.१५ वरून ८८%