लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. त्यात दक्षिण मध्य मुंबईमधून माजी खासदार एकनाथ गायकवाड, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, शिर्डीतून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, धुळे येथून कुणाल रोहिदास पाटील, नंदूरबारमधून के. सी. पडवी, वर्धा येथून माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या अ‍ॅड. चारुलता टोकस आणि यवतमाळ वाशिम मधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील आतापर्यंत १२ उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यात मुंबईतील तीन जागांचा समावेश आहे.