25 September 2020

News Flash

मोठी बातमी : मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू

करोनाच्या प्रादुर्भावावर मोठा निर्णय

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १ जुलै मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी मिशन बिगीन अंतर्गत सरकारनं मोठी सुट दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात, तसंच प्रामुख्यानं मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे.

आणखी वाचा- मुंबईतील करोना मृत्यूदर वादात!

तसंच यापूर्वीप्रमाणे रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

आणखी वाचा- मुंबई पोलिसांनी सहा पोलिसांविरूद्ध दाखल केला गुन्हा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. तसंच मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या ७५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मिशन बिगिनला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांच्या मदतीनं अनेक खासगी कार्यालयंही सुरू करण्यात आली होती. तसंच सुट दिल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दीही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 1:57 pm

Web Title: section 144 imposed in mumbai coronavirus mumbai police commissioner jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईतील करोना मृत्यूदर वादात!
2 पवईतील हिरानंदानी परिसरातील इमारतीला लागलेली आग आटोक्यात
3 “यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”; लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय
Just Now!
X