महालक्ष्मी मंदिर परिसरात महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. तो ब्रीच कँडी येथील एका इमारतीचा सुरक्षा रक्षक आहे. शफिक अहमद खान उर्फ साहिल (२५) असे त्याचे नाव असून तो जम्मू काश्मीरचा रहिवासी आहे. महालक्ष्मी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या एका घरात ही घटना घडली होती.
अ‍ॅण्टॉप हिल येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेच्या भाच्याला कामाची गरज होती. आरोपी शफिक खान याने तिचा भ्रमणध्वनी मिळवून तिला फोन केला. मी सुरक्षा रक्षक तसेच घरगडी म्हणून मुलांना कामाला लावतो असे त्याने सांगितले होते. यासाठी त्याने या महिलेला १९ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी मंदिराजवळ भेटायला बोलावले होते. तिला त्याने गुंगीचे औषध असलेलेल शीतपेय पिण्यास दिले. तिला चक्कर येऊ लागल्याने त्याने तिला आराम करण्यासाठी मंदिराला लागून असलेल्या खंडेलवाल या दुमजली पडीक इमारतीत नेले. येथील एका रिकाम्या खोलीत त्याने या महिलेवर बलात्कार केला. जाताना त्याने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल आणि रोख रक्कम असा ५५ हजारांचा ऐवज लंपास केला.
गावदेवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने बुधवारी शफिकला वांद्रे पाली हिल येथून अटक केली. तो मूळचा जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्’ाातील असून गेल्या १२ वर्षांपासून मुंबईत ‘व्ही टू मॅक्स’ या सुरक्षा एजन्सी मार्फत नेपियन्सी रोड येथील एका इमारतीत रक्षकाचे काम करतो असे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले. या घटनेनंतर तो काम सोडून गेला होता. त्याचे व्यक्तिमत्व भारदस्त होते आणि तो कामाचे आमिष दाखवून मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असे. एका मित्राकडून या महिलेचा भ्रमणध्वनी क्रमांक त्याला मिळाला होता, अशी कबुली त्याने त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
बलात्काराचा अड्डा
जेथे बलात्कार झाला ती दुमजली खंडेलवाल ही पडीक इमारत महालक्ष्मी मंदिराच्या अगदी लगत आहे. तेथीलच एका रिकाम्या घरात शफिकने बलात्कार केला. तो नेहमी इथे मुलींना अशा कामासाठी आणत असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष