News Flash

एक्सलन्स के पिछे भागो, सक्सेस अपने आप पिछे आएगा

‘तो आला.. त्याने पाहिले.. तो जिंकला..’ आयआयटी पवईच्या मूड इंडिगोमध्ये रविवारी काहीसे असेच घडले. हिंदी चित्रपटांमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा

| December 23, 2013 01:49 am

‘तो आला.. त्याने पाहिले.. तो जिंकला..’ आयआयटी पवईच्या मूड इंडिगोमध्ये रविवारी काहीसे असेच घडले. हिंदी चित्रपटांमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान मूड इंडिगोच्या ‘इल्युमिनाटी’साठी आला आणि त्याने अक्षरश: सर्वानाच जिंकून घेतले. आयआयटीच्या दीक्षांत सभागृहात जमलेल्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचे अत्यंत प्रामाणिक उत्तर देत त्याने सर्वानाच आपलेसे केले. ‘एक्सलन्स के पिछे भागो, सक्सेस अपने आप पिछे आएगा’ हा थ्री इडियट्समधील मंत्रच त्याने आयआयटीयन्सना देत या सर्वाबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.
आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो या महोत्सवात यंदा आमीर खान येणार, हे कळल्यानंतरच त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सगळ्यांना होती. ‘थ्री इडियट्स’मध्ये आयआयटीयन्सच्या जीवनशैलीशी मिळतीजुळती जीवनशैली अनुभवलेल्या आमीरने या चित्रपटाद्वारे शिक्षणपद्धतीवर खूपच छान भाष्य केले होते. त्यामुळे तर त्याचा ‘रँचो’ अभियांत्रिकी विषयाच्या विद्यार्थ्यांमध्ये खूपच प्रसिद्ध झाला.
विशेष म्हणजे आमीरला ऐकण्यासाठी, त्याला प्रश्न विचारण्यासाठी अक्षरश: हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आले होते. आयआयटीच्या दीक्षांत सभागृहात साडेतीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गर्दी केली. यापैकी अनेकांनी त्याला आपल्या मनातले प्रश्न विचारले. या प्रश्नांना आमीरने खूपच प्रामाणिक उत्तरे दिली. ‘थ्री इडियट्समधल्या तुझ्या भूमिकेचे म्हणणे तुला पटते का? यशासाठी धावण्यापेक्षा योग्यतेसाठी झगडणेच बरोबर आहे का?’ या प्रश्नाला उत्तर देताना त्याने पुन्हा एकदा तोच मंत्र आयआयटीयन्सना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:49 am

Web Title: seek excellence success will follow aamir khan
Next Stories
1 नरिमनपेक्षा बीकेसीचा भाव वधारला
2 राष्ट्रवादीचा ‘व्होट फॉर भारत’चा नारा
3 गोपीनाथ मुंडेंची तयारी ३३ जागांची
Just Now!
X