News Flash

‘स्वयंघोषित पास’ उपक्रम गुंडाळला

पोलिसांनी अत्यावश्यक सेवा आणि शासनाने प्रवासास मुभा दिलेल्या यंत्रणांशी निगडित वाहनांची वर्गवारी तीन रंगांमध्ये के ली होती.

मुंबई : वाहतूक कोंडीत अत्यावश्यक सेवेतील, विशेषत: आरोग्य सेवेशी संबंधित वाहने खोळंबू नयेत यासाठी सुरू करण्यात आलेली स्वयंघोषित पास (रंगीत स्टिकर) उपक्रम आठवड्याच्या आत गुंडाळण्याची वेळ मुंबई पोलिसांवर आली आहे. सेवेचा दुरुपयोग वाढल्याने आणि नागरिकांमध्ये या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्तालयातून सांगण्यात आले.

मुंबईच्या हद्दीत अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर कामाच्या स्वरूपानुसार लाल, हिरवा आणि पिवळा या तीन रंगांतील स्टिकर्स लावणे बंधनकारक करण्यात आले होते. पोलिसांनी अत्यावश्यक सेवा आणि शासनाने प्रवासास मुभा दिलेल्या यंत्रणांशी निगडित वाहनांची वर्गवारी तीन रंगांमध्ये के ली होती. त्यानुसार रंगांचे वर्तुळाकार कागद, स्टिकर वाहनांवर पुढील व मागील बाजूस चिकटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. टोल नाक्यांसह वाहनांच्या तपासणीसाठी सुरू के लेल्या नाकाबंदी कारवायांमध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा खोळंबा होऊ नये या उद्देशाने स्वयंघोषित पास योजना सुरू के ल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले होते. या वाहनांसाठी विशेष मार्गिके ची व्यवस्थाही करण्यात आली होती. १८ एप्रिलपासून हा उपक्र म सुरू झाला. मात्र, आठवडाही पूर्ण होत नाही तोच शुक्र वारी रात्री हा उपक्र म बंद करण्याचा निर्णय नगराळे यांनी घेतला.

गैरफायदा घेणाऱ्यांचा त्रास

रंगीत स्टिकर असलेल्या प्रत्येक वाहनाची तपासणी करणे शक्य होत नव्हते. ते पाहून अनेक नागरिकांनी आपल्या वाहनांवर असे स्टिकर लावले. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली, त्यामुळे हा उपक्रम बंद करावा लागला, अशी माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिली. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांमध्ये या

उपक्र माबाबत संभ्रम होता. शिवाय या उपक्र मास लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांचा विरोधही वाढला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:12 am

Web Title: self proclaimed pass initiative was rolled out akp 94
Next Stories
1 मयूर शेळकेच्या शौर्याची ‘या’ कंपनीकडून दखल; महागडी मोटारसायकल देऊन केला सन्मान
2 “…असं केल्यानं बराच त्रास कमी होईल”; वाढदिवसानिमित्त सचिनचं चाहत्यांना आवाहन
3 Adar Poonawalla : हे असं का? फरहान अख्तरचा थेट अदर पूनावालांना सवाल…!
Just Now!
X