दुष्काळग्रस्त भागात सेल्फी काढल्यामुळे वादाच्या भोवऱयात सापडलेल्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बचावासाठी महसूल मंत्री एकनाथ खडसे पुढे सरसावले आहेत.

सेल्फी काढणे ही काय मोठी गोष्ट आहे का? आत्ताच एकाने माझा सेल्फी काढला, अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाला उचलून धरण्याचे काहीच कारण नसल्याची भावना व्यक्त केली.

दुष्काळी भागातील पंकजा मुंडेंचा सेल्फी वादाच्या भोवऱ्यात

पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दुष्काळग्रस्त लातूरच्या मांजरा नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू असतानाचा सेल्फी ट्विट केला होता. हा सेल्फी सध्या सोशल मिडीयावर फिरत असून विरोधकांनी पंकजा यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ खडसेंना विचारणा केली असता पंकजांनी सेल्फी काढला तर काय बिघडले? या भावनेने खडसेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सेल्फी ही काही मोठी गोष्ट नाही, असे एकनाथ म्हणाले.