बदललेल्या जीवनशैलीमुळे शहरी जीवनात वित्त आलेच, पण त्यासाठी अनेकांना आरोग्याची किंमत मोजावी लागली आणि आपली ‘आरोग्य संपदा’ जपण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांचा ऊहापोह गरजेचा होऊ लागला. त्याचसाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यमान भव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य संदर्भातील प्रश्न, जीवनशैली, आहार, मानसिक आरोग्य या संदर्भात खास परिसंवाद आणि आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान साने केयर माधवबाग, तन्वी हर्बल, श्री डेंटल, एएनएसएसआय, पितांबरी, युबी ग्लॅमरस आणि चैतन्य होमिओ क्लिनिक आदींतर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी स्टॉल मांडण्यात येणार आहेत. ‘साने केयर माधवबाग’तर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार असून आहाराच्या सवयींबाबत सल्लेही देण्यात येणार आहेत. तसेच हृदयरोगावरील उपचारांसाठी विशेष सवलतीचे कूपनही स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याबरोबरच औषधे आणि अन्य उत्पादने सवलतीच्या दरात मिळणार आहेत.
ज्यांना केवळ स्टॉलवरील आरोग्यविषयक सल्ल्यांचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांना शनिवार व रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रवेश दिला जाईल.
मार्गदर्शक :
*सकाळी १० वा.- विख्यात शल्यचिकित्सक व लेखक डॉ. रवी बापट, विषय : ‘सर्वसाधारण आरोग्य’
*सकाळी ११.१५ वा.- प्रसिद्ध आहारतज्ज्ञ वैद्य सुचित्रा कुलकर्णी, विषय : ‘आहार आणि आरोग्य’
*दुपारी १२.१५ वा.- केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर, विषय : ‘मनाचे आरोग्य’
(शनिवारी आणि रविवारी दोन दिवस याच वेळेला आणि याच विषयांवर वेगवेगळ्या श्रोत्यांसमोर हे परिसंवाद होतील.)
प्रवेशिका कोठे मिळणार?
या कार्यक्रमासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क असून प्रवेशिका लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, कॉसमॉस बँकेच्या वर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे आणि टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असतील.
आरोग्यमान भव!
(आरोग्य विषयांवर परिसंवाद व प्रदर्शन)
*२० आणि २१ सप्टेंबर, सकाळी १० वा.
*टिप टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.)