News Flash

भाजपच्या कोंडीवरून सेनेत तट

मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर एलईडी दिवे बसविणाऱ्या भाजपला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये या मुद्दय़ावरून तट पडले आहेत.

| July 7, 2015 02:49 am

मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर एलईडी दिवे बसविणाऱ्या भाजपला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये या मुद्दय़ावरून तट पडले आहेत.
क्वीन्स नेकलेसचे सौंदर्य कमी करणारे एलईडी दिवे काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सभागृहात या प्रश्नाची तड लावावी, असा मुद्दा शिवसेनेतील काही नगरसेवकांनी पालिकेतील स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. पण भाजपच्या धास्तीमुळे जुन्या पदाधिकाऱ्यांनी त्यास विरोध करून स्वपक्षाच्या नगरसेवकांना रोखले. पालिका सभागृहाच्या सोमवारच्या बैठकीत एलईडी विषय उपस्थित करून भाजपचा समाचार घ्यावा, असा आग्रह काही नगरसेवकांनी धरला होता. आता भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात शिवसेनेपुढील अडचणी वाढू शकतील, अशी भीती व्यक्त करीत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वपक्षातील नगरसेवकांना सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यापासून रोखले. दरम्यान, मरिन ड्राइव्ह येथे बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांचा खर्च  ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 2:49 am

Web Title: sena bjp spar in bmc over marine drive led lights
Next Stories
1 राज्य बँक प्रकरणात संचालकांच्या याचिकेवर आज निर्णय?
2 विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे औरंगाबाद येथून अटकेत
3 अपघातग्रस्त लोकलच्या मोटरमनला वाचविण्याचा प्रयत्न ?
Just Now!
X