23 September 2020

News Flash

वीर सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा-संजय राऊत

संजय राऊत यांचं हे वक्तव्य शिवसेनेला अडचणीत टाकणारं ठरू शकतं

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलाच पाहिजे. जे विरोध करत असतील त्यांना अंदमानात पाठवा असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. अंदमानात सावरकरांनी जी शिक्षा भोगली तिथे त्यांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना दोन दिवस तरी धाडायला हवं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. महाविकास आघाडीचा सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही पक्षविरोधी आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनाही वीर सावरकर यांचं कार्य ठाऊक आहे. मात्र सावरकरांना भारतरत्न द्यायचं की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा असतो. सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातली 14 वर्षे काळकोठडीत घालवली आहेत. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना भारतत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं अशी शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे. सावरकर यांना भारतरत्न देणाऱ्यांना जे विरोध करतील मग ते अगदी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी जिथे शिक्षा भोगली तिथे दोन दिवस पाठवायला हवं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी डॉन करीम लाला हा माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटला होता. तसंच इंदिरा गांधीही त्याला भेटण्यासाठी मुंबईत येत असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर काँग्रेसची प्रचंड नाराजी समोर आली. या नाराजीनंतर संजय राऊत यांना जाहीर मुलाखतीत केलेलं हे वक्तव्य मागे घ्यावं लागलं. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी वीर सावरकर आणि भारतरत्न याबाबत एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी माझं नाव राहुल सावरकर नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुनही बराच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी शिवसेनेने मवाळ भूमिका घेतली म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जी भूमिका घेतली आहे तो काँग्रेसला अप्रत्यक्ष सल्ला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:33 pm

Web Title: send those andaman who oppose savarkar to give bharat ratna says sanjay raut scj 81
Next Stories
1 मनसेच्या झेंडयाच्या प्रश्नावर नेता म्हणतो ‘सब्र का फल मीठा होता हैं’
2 मनसेचा ‘हा’ माजी आमदार राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचला कृष्णकुंजवर
3 मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास २० वर्षे सक्तमजुरी
Just Now!
X