16 October 2019

News Flash

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर आता माहितीच्या महाजालावर !

ज्येष्ठ लेखिका आणि कथाकथनकार गिरिजा कीर यांनी माहितीच्या महाजालात प्रवेश केला असून त्यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संकेतस्थळ सुरू केले आहे. www.girijakeer.in असे संकेतस्थळाचे

| February 8, 2013 04:37 am

ज्येष्ठ लेखिका आणि कथाकथनकार गिरिजा कीर यांनी माहितीच्या महाजालात प्रवेश केला असून त्यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संकेतस्थळ सुरू केले आहे. www.girijakeer.in  असे संकेतस्थळाचे नाव आहे. डॉ. मंगेश कश्यप यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.
कथा, कादंबरी, बालसाहित्य, नाटक, कविता आदी विषयांवर कीर यांनी लेखन केले असून सुरुवातीच्या काळात त्यांनी स्त्रीवादी लेखन करून महिलांच्या भावविश्वातील विविध समस्यांना वाचा फोडली होती. आजवर कीर यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच कथाकथनाचे दोन हजारांहून अधिक कार्यक्रम भारतात आणि परदेशात झाले आहेत. या संकेतस्थळावर कीर यांच्या समग्र साहित्याची सूची देण्यात आली आहे. विविध नामवंतांचे आणि सर्वसामान्य वाचकांचे कीर यांच्या लेखनाविषयी अभिप्रायही येथे आहेत.
या संदर्भात गिरिजाताई म्हणाल्या की, हे संकेतस्थळ म्हणजे डॉ. कश्यप यांनी मला ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेली अमूल्य भेट आहे.

First Published on February 8, 2013 4:37 am

Web Title: senior authoress girija keer now on internet
टॅग Internet