News Flash

उधळलेल्या घोडय़ामुळे एक जखमी

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील वर्षांनगर परिसरातून पायी ते घरी जात होते.

उधळलेल्या घोडय़ाने एका ज्येष्ठ नागरिकाला लाथ मारल्यानंतर तो गंभीर जखमी झाल्याने विक्रोळी पार्कसाइट पोलिसांनी घोडेस्वारावर गुन्हा दाखल करत घोडय़ाला ताब्यात घेतले आहे. विक्रोळी पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथील कैलास कॉम्प्लेक्स परिसरात गणपत सखाराम नेवाळेकर (६२) राहतात.
सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील वर्षांनगर परिसरातून पायी ते घरी जात होते. त्याच दरम्यान, मागून आलेल्या एका घोडय़ाने त्यांना लाथ मारली. त्यामुळे ते एका दगडावर पडून जबर जखमी झाले. त्या वेळी घोडेस्वार घोडय़ाला घेऊन पसार झाला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी निंबाळकरांना केईएम रुग्णालयात दाखल केले. त्याच्या तक्रारीवरून तपास करीत पोलिसांनी एका काळ्या रंगाच्या घोडय़ाला ताब्यात घेतले आहे. तर, अज्ञात घोडेस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. नेवाळेकर यांची प्रकृती चिंताजनक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2016 12:01 am

Web Title: senior citizen seriously injured after kicked by horse
Next Stories
1 त्यावेळी मला हरविण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती – राम नाईक
2 दाभोलकर, पानसरे हत्येच्या तपासावरून हायकोर्टाने पुन्हा तपास संस्थांना फटकारले
3 वॉशिंग मशिनमधून आणली सोन्याची बिस्कीटे, मुंबई विमानतळावर एकाला अटक
Just Now!
X