News Flash

काँग्रेसला अग्रस्थानी नेण्याचा संकल्प-पटोले

काँग्रेसमधून नाइलाजाने गेलेले नेते भाजपमध्ये अस्वस्थ असून त्यांच्या घरवापसीचा कार्यक्रम हाती घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात संघर्ष करीत असून त्यांच्या संघर्षाला ताकद देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केले. भाजपमधील अस्वस्थ नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश द्यावा, असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त के ले. तर मुंबईत आगामी निवडणुकीत पक्षाला स्वबळावर लढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी के ली.

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने संकल्प दिन, टिळक भवनचे नूतनीकरण आणि माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के . पाटील, सुशीलकु मार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. राहुल गांधी यांनी नोटाबंदी, करोना, जीएसटी आदी विषयांवर मोदी सरकारला जनहितासाठी अनेकदा सूचना केल्या. त्या किती  योग्य होत्या, त्याची जाणीव आता होत आहे. पण त्याकडे मोदी सरकारने लक्ष दिले नाही व परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. देशाला आता दूरदृष्टी असलेला, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा, सर्वसमावेशक, अशा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची देशाला गरज आहे.

काँग्रेसमधून नाइलाजाने गेलेले नेते भाजपमध्ये अस्वस्थ असून त्यांच्या घरवापसीचा कार्यक्रम हाती घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. जनसंपर्काचे अभियान हाती घेऊन राहुल गांधींच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करण्यासाठी पक्ष संघटना व शासन यांना एकत्रित काम करावे लागणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त के ले.

कुपोषित बालकांना सरकारने दत्तक घ्यावे

महाराष्ट्रातील ७९ हजार कुपोषित मुलांना दत्तक घेऊन सहा महिन्यांमध्ये सुदृढ बनविण्याचा संकल्प राज्य सरकारने घ्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केल्याचे पक्षाचे राज्याचे एच के पाटील यांनी सांगितले. मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील दोन हजार कुपोषित मुलांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:13 am

Web Title: senior congress leader rahul gandhi modi government congress ashok chavan akp 94
Next Stories
1 मुंबईत २४९ केंद्रांवर लस
2 आषाढी एकादशीला दहा पालख्यांचा एसटीतून प्रवास
3 “…तर लोक जोड्यानं मारतील”, स्वबळाच्या नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावलं!
Just Now!
X