05 July 2020

News Flash

ज्येष्ठ महिलेचा लोकलमध्ये विनयभंग

मुंबई : विरार-चर्चगेट उपनगरी गाडीतून प्रवास करणाऱ्या एका सत्तर वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिलेचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी

मुंबई : विरार-चर्चगेट उपनगरी गाडीतून प्रवास करणाऱ्या एका सत्तर वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिलेचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अमितकुमार झा (२२) याला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. उपनगरी गाडीतून ही महिला रात्री साडेदहाच्या सुमारास माल डब्यातून एकटीच प्रवास करत होती. याच डब्यातून प्रवास करणाऱ्या अमितकुमार याने विरारहून गाडी सुटल्यानंतर तिची छेडछाड करायला सुरुवात केली. गाडी भाईंदर येथे पोहोचली तेव्हा त्या महिलेने आरडाओरड केली. प्रवासी गोळा झाले आणि त्यांनी अमितकुमारला पकडून पोलिसांच्या हवाली केले.रात्रीच्या वेळेस घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 12:08 am

Web Title: senior woman molestation in local train
टॅग Local Train
Next Stories
1 विद्यार्थिनीची आत्महत्या
2 अभिनेत्री हेमा उपाध्यायचा गटारात सापडला मृतदेह
3 आनंदवनातील ‘दृष्टिदान यज्ञ’..!
Just Now!
X