आशियाई बाजाराची डळमळीत स्थिती आणि फंड व किरकोळ गुंतवणूकदारांच्या विक्रीचा जोर कायम राहिल्यामुळे गुरूवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल ७०० अंकांनी कोसळला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स ८५८ अंकांनी कोसळला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीतील ही घसरण यंदाच्या वर्षातील पहिली मोठी घसरण असल्याचे बोलले जात आहे. सेन्सेक्सच्या या पडझडीचे पडसाद राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशंकावरही  (निफ्टी )पहायला मिळाले. निफ्टीमध्ये २९.५० अंकांची घसरण झाल्यामुळे निर्देशांक ७,१८६ च्या पातळीपर्यंत घसरला. बाजारात सातत्याने सुरू असलेली विक्री आणि गेल्या आठवडाभरात आशियाई बाजारात असलेली डळमळीत परिस्थिती  या घसरणीसाठी कारणीभूत असल्याचे दलालांचे म्हणणे आहे.