आशियाई शेअर बाजाराची मंद सुरुवात आणि वॉलस्ट्रीटमधील शेअर बाजारातील घसरण याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळाला. बाजार सुरु झाला त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स ४४० अंशांनी कोसळला. तर निफ्टीमध्येही १०० अंशांपेक्षा अधिक घसरण पहायला मिळली.


सेन्सेक्स कोसळल्याने त्याचा निर्देशांक ३३,५९३.८७वर पोहोचला तर निफ्टी १३४.०५ ने कोसळून १०,०९०.७० वर पोहोचला. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत १९ पैशांनी घसरली त्यामुळे रुपयाची किंमत प्रति डॉलर ७३.३४ रुपये झाली आहे. यापूर्वी बुधवारी रुपया ७३.१५ रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने रुपयाला आधार मिळाला होता.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे मुंबईच्या शेअर बाजारात छोट्या मिडलकॅप शेअर्समध्येही घसरण पहायला मिळली. बीएसईचा स्मॉलकॅप अंश ०.४३ टक्के तर मिडलकॅप अंश ०.४१ टक्के घसरणीने व्यवसाय करीत आहे. त्याचबरोबर बँक, मेटल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे.